प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी दि.1 ते 15 जानेवारी पर्यंत लातुर जिह्यात जमावबंदी,शस्ञबंदी लागु केल्याचे अप्प. जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी घोषीत केले आहे.माञ हा कायदा फक्त शहरांसाठीच आहे. काय असा सवाल सुज्ञ हाळी-हंडरगुळीकर जनता संबंधित प्रशासनास चर्चेतुन विचारतात याची थोडक्यात माहिती अशी की,लातुर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व सार्वजनिक शांतता,सुरक्षा अबाधित राखण्यासाठी लातुरचे कर्तबगार जि. दंडाधिकारी महोदय हे आदेश काढत व सर्व संबंधित तहसील व पोलिस ठाणे यांना या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे सुचना करतात. माञ जिल्हादंडाधिकारी साहेबांच्या आदेश / सुचना यांचे आजवर हाळी व हंडरगुळीत जनतेनी पालन केलेले नाही.तसेच हा कायदा पायदळी तुडवुन D.j.डिजेच्या भल्यामोठ्या आवाजाच्या तालावर 100 एक “देशप्रेमीं” मेन मार्केटसह,विविध मंदीरापुढे व गल्ली बोळात”धिंगाणा” करताना दिसतात.कारण आजवर यावर कुणीही कारवाही करायची “डेअरींग” दाखवली नाही.व आता ही दाखविणार नाहीत.कारण आता दि.१/१/२४—१५/१/२४ पर्यंत अप्पर जिल्हादंडाधिकारी साहेबांनी लातुर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी मुंबई पुलीस अधिनियम 1951 च्या कलम 37(1) (3) अन्वये लातुर जिल्हा हद्दीमध्ये जमावबंदी, शस्ञबंदी आदेश जारी केले असुन,हा आदेश दि.1 ते 15 जानेवारी 24 रोजीच्या 24.00 वाजे पर्यंत 2 ही दिवस धरुन लागु असेल. या आदेशान्वये शस्ञे, भाले, तलवारी, दंडुके,सुरे,बंदुका,लाठ्या,काठ्या इ. किंवा शाररिक ईजा व हानी करणारी वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही तसेच जाहिरपणे घोषणा देणे,डी.जे. DJ (गाणे) लावणे,व इतरांना ञास होईल असे वाद्य वाजविणे यावर प्रतिबंध राहील.तसेच कुठे ही पाच वा अधिक लोकांनी एकञ जमण्यास व मिरवणुक काढण्यास सक्त मनाई इ. आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी सर लातुर यांनी काढले असुन,या आदेशा चे पालन न करणा-यांवर खरचं आता तरी कारवाई करायची “डेअरींग” सर्व संबंधित अधिका-यानी दाखवावी अशी विनंती वजा मागणी सामान्य जनतेतून होतेय.व याकडे हंडरगुळी – करांचे लक्ष आहे.व हा कायदा फक्त शहरी भागासाठी आहे. काय? असा सवाल सुज्ञ जनतेतून चर्चीला जातोय.

