बळीराम लांडगे
तालुका प्रतिनिधी,
उदगीर
उदगीर तालुक्यातील हंडरगुळी हे गाव गुरांच्या बाजारासाठी जसे पर राज्यात प्रसिध्द आहे.तसे राज्यात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या विकण्यासाठी सर्वदुर “फेमस” आहे. आणि आयपीएस.निकेतन कदम यांची प्रोमोशनवर नागपुरला बदली होताच पोलीसांची सरेआम “बेअब्रू” करणा-या व परवाच 24 हजार रु. चा गुटखा एलसीबी,लातुरच्या एका पथकाने “रेड” करुन पकडला होता. त्याच्या दुस-याच दिवशी पासुन पुन्हा “हरी ॐ ” म्हणत व “खाकी” ची सरे – आमपणे बे इज्जत करत खुलेआम गुटखा विकणा-या हंडरगुळी ता. उदगीर या गावच्या गुटखा विक्रेत्या “होलसेल डिलरला” आधार कुणाचा आहे.असा प्रश्न जनतेतुन चर्चीला जात आहे.तसेच परवाच एलसीबी चे एका पथकाने टाकलेल्या धाडी मध्ये फक्त “गोल्ड” नावाचाच गुटखा कसा सापडला. आरएमडी, रजनिगंधा, बाबा रत्ना 120/300 तसेच विमल, गोवा, राजनिवास, नजर या नावाचा गुटखा, सुगंधीत तंबाखु, जर्दा सापडला कसा नाही? की “रेड” मारणा-या “टीम”ने कांही “मांडवली” तर केली नाही. ना.. अशी कुजबूज ऐकू येते.कारण साध्या पान टपरीत सर्व प्रकारचा गुटखा हा मिळतोच मिळतो. तर मग ज्या टपरीत गुटखा पुरवठा करतो त्या हंडरगुळी येथील विक्रेत्याकडे वरील नावांचा सर्व गुटखा, जर्दा असतोच असतो. तरी पण फक्त एकच नमून्याचा तोही फक्त 24 हजाराचा गुटखा कसा काय एलसीबी च्या “त्या” टीमला सापडला. बाकी कंपनीचा गुटखा व सुंगधी जर्दा सापडला-दिसला नाही. कसा. की यात कांही तरी “मांडवली” नक्कीच झाली असेल.अशी शंका वजा कुजबुज येथे जाणकार मंडळी व्यक्त करतात.अण् ही “रेड” म्हणजे “खोदा पहाड और निकला चुहा” अशीच म्हणावी लागेल तेंव्हा अत्यंत तत्परतेने एलसीबी च्या एका पथकाने केलेल्या या “रेड” बद्दल कौतूक व स्वागत होत असलेतरी ही आसपासच्या 20 एक गावात तसेच शिरुर ताजबंद येथे ही होलसेल व किरकोळ गुटखा विकणा-या येथील “होलसेल डिलर” कडील “रेड” मध्ये फक्त एकाच नावाचा गुटखा L.C.B. च्या त्या साहेबांना मिळाला. तसा अन्य कंपनी व वरील नावाचा गुटखा कसा काय मिळाला नाही.म्हणुन या “रेड” बद्दल जनतेसह कांही पोलीस ही वेगवेगळी चर्चा करतात. म्हणे..! तेंव्हा IPS पोलीस अधिकारी निकेतन कदम यांच्या नावानेच सर्व अवैध धंदेवाले थरथरा कापायचे.पण त्यांची बदली होताच सरेआम “खाकी वर्दी” ची बेअब्रू करुन खुलेआमपणे गुटखा विकणा-यास “आधार” देतोय कोण.याची व या “रेड” मध्ये कांही “मांडवली” झाली का.याची चौकशी वरिष्ठांनी करावी.व सोमयजी मुंडे एस. पी. व एलसीबी प्रमुख लातुर मिरकलेजी हे चौकशी करतील का. याकडे हंडरगुळीकरांचे लक्ष आहे..

