prabodhini news logo
Home चंद्रपूर दै. विदर्भ न्युज या वृत्तपत्राच्या नावाने बेकायदेशीर रित्या जाहिरात व पैसा गोळा...

दै. विदर्भ न्युज या वृत्तपत्राच्या नावाने बेकायदेशीर रित्या जाहिरात व पैसा गोळा करणाऱ्या तोतया पत्रकारांना त्वरित अटक करावी- संपादक सोमेश्वर येनचलवार

0
313

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर- दैनिक विदर्भ न्यूज वृत्तपत्र हे अनेक वर्षापासून प्रकाशित केले जात आहे या वृत्तपत्रांमध्ये कोणतेही संपादक मंडळांनी कोणतीही नियुक्ती केली नसताना तोतया पत्रकार वृत्तपत्राच्या नावाने लेटर पॅड छापून जाहिराती व पैसा गोळा करत आहे.
कोणताही संबंध नसतांना दै. विदर्भ न्युज या वृत्तपत्राचा नावाचा वापर करणाऱ्या चंदन देवांगन रा. गोपालकृष्ण मंदिर, बालाजी वार्ड क्र. २. चंद्रपुर, प्रभुदास सांडा, शुभम कलकोटवार या तिज्ञा भामट्या पत्रकारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशिर कारवाई करणेबाबत केली आहे.

मागील अनेक वर्षापासुन विदर्भ न्युज नावाचे दैनिक वर्तमानपत्र चंद्रपूर येथून प्रकाशित होत असून मी अर्जदार सोमेश्वर येलचलवार या वृत्तपत्राचा संपादक आहे. तसेच महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. सामाजिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी दैनिक विदर्भ न्युज प्रकाशित करण्यात आले आहे. पत्रकारांच्या समस्यांवर आवाज बुलंद करणारे महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाचे दैनिक विदर्भ न्युज हे मुखपत्र आहे. आफीसर या वृत्तपत्रासाठी आम्ही कोणत्याही अधिकृत नियुक्त्या केलेल्या नाहीत.

दैनिक विदर्भ न्युज च्या नावाने चंद्रपूर-गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यातून पैशाची मागणी होत असल्याची आम्हाला माहिती मिळाली असुन विविध कार्यक्रमाच्या व दिपावली विशेषांकाच्या नावाने ही अवैध वसुली करण्यात येत असुन दैनिक विदर्भ न्युज च्या संपादक मंडळांनी कोणाचीही नियुक्ती केली नसतांना चंदन देवांगन रा. गोपालकृष्ण मंदिर, बालाजी वार्ड क्र. २. चंद्रपुर, प्रभुदास तांडा, शुभम कलकोटवार हे तिन भामटे दैनिक विदर्भ न्यूज च्या नावाने लेटरपॅड छापून पैशाची मागणी करीत आहे. या तिज्ञा भामट्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशिर कारवाई करण्यात यावी, यासाठी हा तक्रार अर्ज मा.पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांना दैनिक विदर्भचे संपादक सोमेश्वर येलचलवार यांनी तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here