कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही – सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत विरव्हा येथील सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाला असल्यामुळे आणि सरपंच पदाची जागा रिक्त असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया आज दिनांक 2 जानेवारी 2024 ला मंगळवार रोजी अध्यासी अधिकारी म्हणून रवींद्र चिडे मंडळ अधिकारी सिंदेवाही व पोलीस बंदोबस्तात निवडणूक पार पडली. ग्रामपंचायत विरव्हा येथील सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण असून संरपच पदाकरीता निवडणुकीमध्ये दोन नांमाकन अर्ज प्राप्त झाले होते.त्यामध्ये गुप्त मतदान प्रक्रिया झाले.व छाया प्रभुदास चौधरी यांची सरपंच पदी निवड करण्यात आली.
यावेळेस सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी सर्कलचे मंडळ अधिकारी अंबादास गेडाम व मुरकुटे तलाठी, अरुणा शेन्डे ग्रामसेवक तसेच विरव्हा येथील ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते.

