संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे केले आयोजन.
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
१ जानेवारी २०२४ ला नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे भीमा कोरेगांव शौर्य दिनानिमित्त क्रिया फाऊंडेशन तर्फे रात्रौला गांधी चौक येथे भीम,बुद्ध,शिवराय,फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीचा जलसा,संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन केलेले होते.
कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील तसेच बाहेर गावातील नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली होती आणि या कार्यक्रामाचा नागरिकांनी एकदम शांतपणे आस्वाद घेला.या वेळेस काही महिला मंडळी तसेच पुरुषांना सुद्धा नाचण्याचा मोह आवरता आला नाही. या वेळेस क्रिया फाऊंडेशनच्या नवीन पत्रिकेचे पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ.सतीश वारजुकर,गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,जि.प.माजी समाजकल्याण सभापती नागराज गेडाम,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नामदेवजी किरसान,वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रभारी अरविंदजी सांदेकर,जि.प.चे माजी सभापती प्रफुल्ल खापर्डे,माजी जि.प.सदस्य खोजराम मरस्कोल्हे,श्रीलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद बोरकर,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अश्विन मेश्राम, चिमूर तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय पा.गावंडे,तालुका काँग्रेसचे सचिव शरदराव सोनवाने,गिरगाव ग्रा.पं.चे माजी सरपंच प्रशांत गायकवाड,गिरगाव ग्रा.पं.च्या उपसरपंच सौ.प्रियंका खोब्रागडे,ग्रा.पं.सदस्य विकास गोंडाने,हसिम सय्यद,समृद्धी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ.शामलता सोनवाने,अंगणवाडी सेविका सौ.माया खोब्रागडे,तहसील कार्यालय नागभीडच्या ए.पी.ओ.सौ.वर्षा बन्सोड,क्रिया फाऊंडेशनचे उपाध्यक्ष प्रमोद डोंगरे,क्रिया फाऊंडेशनच्या महिला कार्याध्यक्षा सौ.गुंफा बोरकर,विद्या खोब्रागडे,वासुदेव सोनवाने,दुर्वास खोब्रागडे,राजेंद्र बोरकर,नरेंद्र खोब्रागडे ई.उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक,सामाजिक कार्यकर्ते सागर खोब्रागडे यांनी केले तसेच प्रास्ताविक क्रिया फाऊंडेशनचे अध्यक्ष कुंदन खोब्रागडे व आभार कार्यक्रम प्रमुख गिरगाव ग्रा.पं.मा.सदस्य राकेश खोब्रागडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी फेडरेशनचे अध्यक्ष चंदन खोब्रागडे,आकाश सोनवाने,आशिक खोब्रागडे,स्वप्नील खोब्रागडे,साहील खोब्रागडे,प्रशांत वाकडे व क्रिया फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी तसेच अन्य सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

