रुपाली रामटेके
विशेष जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली
चामोर्शी- दि.०१/०१/२०२४ रोजी मौजा मुरखळा माल ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे नववर्षाच्या शुभ पर्वावर विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी महिला दंडार मंडळ मुरखळा माल यांच्या वतीने. “संसाराची धूळध्यानी” दंडारीच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या उध्दाटकिय भाषणात दंडार ही पारंपारिक लोककला असून या कलेचे जतन करीत असल्यामुळे गावकऱ्यांचे विशेष करून महिलांचे आभार मानले. लोककला ही लोप पावत चाललेली आहे, अलीकडच्या काळात आधुनिकीकरणामुळे दंडार ही कला सुद्धा लोप पावत चाललेली आहे. पूर्वीसारखे आता दंडारीचे प्रयोग बघायला मिळत नाहीत परंतु मुरखडा वासियांनी ही कला जोपासण्याचे काम केले आहे. या ठिकाणी या दंडारीत सर्व महिलाच सादरीकरण करणार असल्याने त्यांची त्यांनी प्रशंसा केली.
यावेळी सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, डॉ. रवींद्र सुरपाम, उपसरपंच मुरखळा लक्ष्मी सालोटकर, दिलीप बनकर, मुरलीधर मगर, दिवाकर पा. भोपये, सुनील कोहपरे, अशोक गेडाम, नीलकंठ सोमनकर, लोकेश सोमनकर, नंदू रायसिडाम, जानकीराम मडावी, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेसक उपस्थित होते.

