निशा सोनवणे
कोकण वि.संपादक
प्रबोधिनी न्युज, मुंबई
मुंबई – आजाद मैदान या ठिकाणी आदरणीय सुरेश मोहिते (महाराष्ट्र सरचिटणीस) प्रो.राज आटकोरे सर (महाराष्ट्र प्रवक्ते, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक) यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांनी केले अमरण उपोषण,
प्रमुख मागण्या : १)जालना जिल्ह्यामध्ये जालना येथे उद्योगी वसाहत एमआयडीसी मधील स्टील कंपन्यांमध्ये कामगारांना युनियन लागू करणे, २)कालिंका स्टील ओम साई राम एस आर जी गजराज आयकॉन राजुरी, मेटा रोल तसेच वरील कंपन्यातील कामगारांची पगार कॅश (नगद) न देता बँक खात्यामध्ये देण्यात यावे.३) स्टील कंपन्यांची चिमण्याची उंची वाढवण्यात यावी व प्रदूषण नियंत्रित करण्यात यावे. ४) सी.एस.आर फंड समाज कार्यासाठी योग्य वापर करण्यात यावा. ५)कामगारांना कंपनी मालकांकडून सुरक्षा किट पुरवण्यात यावी. ६)कामगारांच्या कामाचे वेळ हे १२ तास होऊन ८ तास करण्यात यावे. ७)स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यात यावे. ८)कामगारांच्या शारीरिक व मानसिक छळ थांबवण्यात यावे.
अशा प्रमुख विविध मागण्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे उपोषण करते प्रकाश पाखरे (जालना जिल्हा अध्यक्ष) व गौतम खंडाळे (जालना तालुका सचिव) यांनी करण्यात आल्या व आमरण उपोषण करत असताना आझाद मैदान या ठिकाणी पोलीस प्रशासन यांनी मंत्रालय मध्ये सचिव यांची भेट घेऊन सर्व मागण्या रास्त असून वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सर्व कार्यकर्त्यांची चर्चा करून कामगारांना न्याय देण्यात येईल असे निर्णय भूमिका घेऊन दीपक पोकळे (उपसचिव-उद्योग ऊर्जा व कामगार विभाग) यांनी आश्वासन देण्यात आले. साहेबांचा विनंतीस मान देऊन आमरण उपोषण स्थगित करण्यात आले, परंतु वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या 16.1.2024 रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन व उपोषण करण्यात येईल शासनाने गांभीर्याने दखल घेण्यात यावी. अशाप्रकारे चर्चा करून महाराष्ट्रातून पाठिंबा देण्यास आलेले पदाधिकारी सुनील भाऊ लोखंडे (मुंबई सचिव), प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षक), विनोद नरवाडे (महाराष्ट्र राज्य आयटी सेल प्रमुख), के.के. जगताप (जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज नगर) स्वामी ज्योतिर्लिंग (सोलापूर जिल्हा अध्यक्ष), संजय गुदगे (कोल्हापूर जिल्हाध्यक्ष), सुरज आरकराव (सोलापूर जिल्हा महासचिव), सिद्धार्थ बनसोडे (अक्कलकोट तालुका अध्यक्ष), बालाजी पठाडे (जळगाव जिल्हाध्यक्ष), विनोद सोनवणे (वं.ब.आ, माजी जळगाव जिल्हाध्यक्ष) पंकज भाऊ सरोदे (वं.ब.आ,आंबेगाव तालुका उपाध्यक्ष) आकाश भैय्या जावळे (बीड जिल्हाध्यक्ष) युसुफ भाई अन्सारी (शिवाजीनगर मानखुर्द तालुका अध्यक्ष), शर्मिलाताई गायकवाड (पालघर जिल्हा अध्यक्ष), गौतम गवई (ठाणे जिल्हा अध्यक्ष), ए. आर. पटेल (कलवा मुंब्रा शहराध्यक्ष) व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून अमर उपोषण करते यांना पाठिंबा देण्यात आला.

