सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर : मिटकॉन कन्सलटंसी अँड इंजिनिअरिंग सहीसेस लिमि. चंद्रपूर व उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसुचित जातीतील युवक व युवतींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत १८ दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम निःशुल्क स्वरुपात राबविण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती अनुसुचित जातीच्या उमेदवारांना देण्याचा उद्देशाने एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळावा तसेच प्रशिक्षणांर्थ्यांच्या प्रतेकक्ष मुलाखत घेणे करीता आयोजन दिनांक ०९/०१/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता, समाज कल्याण सभागृह, शासकीय दुध डेअरी समोर, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, उद्योग उभारणी, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योगांना भेटी, उद्योग निवड प्रक्रिया, विक्री व व्यवस्थापन कौशल्य, उद्योगाला लागणारे विविध नोंदणी व परवाने या व्यतिरिक्त निधी उभारणीकरीता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये दिल्या जाणार आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणीकरीता मिटकॉन कन्सलटंसी अँड इंजिनिअरिंग सव्हींसेस लिमि. चंद्रपूर, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, चंद्रपूर येथे संपर्क साधावा तसेच मेळाव्याला येतांना मुलाखती करीता आपले सोबत कागदपत्रांची सत्यप्रत घेवून येणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्य प्रशिक्षक, ९८२२७०७८४८ यांनी केलेले आहे.

