प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
परिवार विकास फाउंडेशन आणि पारमिता सामाजिक व शैक्षणिक संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व आरोग्यमित्र “हेल्थकार्ड” प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमास यवतमाळ जिल्ह्यातील नामांकित व तज्ञ डॉक्टरांची (डॉ. गौरव धोत्रे नाक कान घसा तज्ञ, डॉ. लोकेश छत्तानी जनरल फिजिशियन, डॉ. वरून दहाके अस्थिरोग तज्ञ, डॉ. मितेश छत्तानी दंतरोग तज्ञ, डॉ. नेहा छत्तानी दंतरोग तज्ञ, डॉ. मीनल डहाके आयुर्वेद तज्ञ, डॉ. दर्शना सावरकर फिजिओथेरपिस्ट) उपस्थिती होते कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय ॲड. आनंद गायकवाड (माझी उपाध्यक्ष नगर परिषद यवतमाळ) प्रमुख पाहुणे मा. नंदकुमार रामटेके (सहाय्यक निम्बंधक मुद्रांक शुल्क नागपूर) मा. कवडू नागराळे (अध्यक्ष- आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यवतमाळ) मा. सुनील वासनिक (आंबेडकरी साहित्यिक यवतमाळ) निलेश सोनटक्के (सिनिअर इंजिनीयर पी. डब्लू. डी. नांदेड) तथा परिवार विकास फाउंडेशन चे संचालक हेमंत त्रिवेदी, महेश भंडारे, अशोक अंबागडे, आदी उपस्थित होते.
मानवी शरीर हे रोगांचे घर झाले असून आपले शरीर निरोगी ठेवणे गरजेचे आहे. आरोग्य सेवेचा अवाढव्य खर्च हा सामान्य जनतेच्या आवाक्याच्या बाहेर असून हेल्थ कार्ड च्या वापरामुळे काही प्रमाणात का होईना रुग्णांचा खर्च कमी करण्याचा संस्थेच्या वतीने प्रयत्न केला असून जनतेने आरोग्यमित्र हेल्थकार्ड चा वापर करावा असे आवाहन माननीय ॲड. आनंद गायकवाड यांनी उपस्थितांना केले.
सदर कार्यक्रम पाटिपुरा येथील गौतमी बुद्ध विहार दलित सोसायटी यवतमाळ येथे पार पडला असून यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सुकेशनी खोब्रागडे, वंदना उरकुटे, शालू खोब्रागडे, ज्योती तामगाडगे, नीलिमा भैसारे . वर्षा चव्हाण, पुष्पा आडे, निर्मला चौधरी, विनोद ढोकणे, नंदू मोहोळ, सुनील ताकसांडे, रवी धाकडे, संगर आनंद गायकवाड यांनी अथक प्रयत्न व परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन माननीय निलेश सोनटक्के यांनी केले.

