आंबेडकरवादी सेनेची राजकीय वाटचाली संदर्भात बैठक

0
85

कोल्हापूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

आंबेडकरवादी सेना सामाजिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न तसेच महिला, विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न यांवर काम करत आहेत त्याच बरोबर हा देश कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो. पण याच देशात सर्वात जास्त आत्महत्या या शेतकरी वर्गाच्या आहेत.शेती मालाला योग्य भाव, आवश्यक बाजारपेठ तसेच अनेक प्रश्नांवर शेतकरी वर्गाचा नाराजीचा सूर आहे यावर आवाज उठवण्यासाठी तसेच शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न करून यापुढे शेतकरी कष्टकरी कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी ही आंबेडकरवादी सेना लढत राहील यासाठी आगामी निवडणुकीत आंबेडकरवादी सेना आपली भूमिका स्पष्ट करेल असं स्पष्ट मत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जाहीर केले होते.

त्यांचं अनुषंगाने आज शासकिय विश्रामगृह सर्किट हाऊस या ठिकाणी रयत क्रांती संघटना / हरित सेनेचे कर्नाटक राज्याचे कार्याध्यक्ष मा.राजू पवार यांनी प्रमुख पदाधिकारी यांची भेट घेवून यापुढील होवू घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणूका या एकत्र येऊन लढवू आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा विधानसभेसाठी समविचारी पक्ष संघटनांना एकत्र घेवून समविचारी परिवर्तनवादी आघाडी स्थापन करून उमेदवार जाहीर करु असे आश्वासन दिले.
लवकरच वेगवेगळ्या पक्ष संघटना यांना एकत्र घेवून राजकिय वज्रमूठ तयार करून लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील..येत्या काही दिवसांत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.बबन कावडे यांनी केले.
यावेळी आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.सुहास हुपरीकर, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.बबन कावडे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मा. शाहीद शेख, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.सचिन आडसूळे, कोल्हापूर जिल्हा महासचिव मा.सुहेल शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here