बंडगार्डन पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी यांना मारहाण करणाऱ्या भाजप आमदार सुनिल कांबळे यांच्यावर कारवाई करण्याची “वंचित बहुजन माथाडी” ची मागणी

0
50

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचारी यांना मारहाण केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे वतीने त्यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या करिता आज मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 तसेच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले सदर विषय अत्यंत गंभीर असून दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी ससून रुग्णालय पुणे येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांनी व्यासपीठावरून उतरत असताना सेवेत असलेल्या बंडगार्डन पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्री. शिवाजी सरक हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना त्यांची लगावली सदरील घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर या घटनेची दखल वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियन वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घेत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच आमदार सुनील कांबळे यांच्यावर मारहाण करणे व पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परवृत्त करणे या गुन्ह्यानुसार योग्य त्या कलमान अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशियाचे निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन पुणे शहर च्या वतीने देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here