हंडरगुळीच्या सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन व आॅक्सिजन यंञ यांची व्यवस्था करा- जनतेची मागणी.

0
117

उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे सरकारी दवाखाना आहे.व या ठिकाणी अत्यंत कमी औषधीसाठा व नौकरवर्गासह विविध समस्या आहेत.त्या समस्या सोडविणे तसेच प्रभारी ऐवजी कायम मुक्कामी राहणा-या डाॅक्टरांसह येथे विविध प्रकारच्या वाढत्या पेशंट्सची गरज लक्षात घेता वरिष्ठांनी एक्स रे मशीन व आॅक्सिजन यंञ यांची व्यवस्था करावी,अशी मागणी गोर गरीब,मध्यमवर्गीय रुग्णांसह जनतेची आहे.आणी ही सोय झाली तर माञ रुग्णांना तालुका व जिल्हा याठिकानी वेळ व जास्त दाम खर्चायची गरजच पडणार नाही.तेंव्हा जिल्हा आरोग्य अधिकारी महोदय याकडे देतील का. व रुग्णांसह जनतेची मागणी व गरज पुर्ण करतील का व कधी ? असा प्रश्न रुग्न व जनतेतर्फे जेष्ठ पञकार पप्पु पाटील यांनी उपस्थित केला आहे.. उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे मार्केट व राज्यमार्गा शेजारी असलेल्या हंडरगुळी येथे माणसांचा असलेल्या सरकारी दवाखान्याला पुर्वी “मदर पीएचसी” चा दर्जा होता. व या अंर्तगत वाढोना, जळकोट अन् देवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होते.व आज वरील तीन ही गावात ग्रामीण रुग्नालये आहेत.तर येथील केंद्र हे होते तसे पण नाही.कारण वीस वर्षापुर्वी या दवाखाण्यात सर्व स्टाॅफ,औषधे व पाच,पाच डाॅक्टर्स 24 तास{ मुक्कामी }असायचे.कारण तेंव्हा सरपंच सतत “वाॅच” ठेवायचे.व डाॅक्टर,कर्मचारी यांचेसह दवाखान्या मधील समस्या शासन,प्रशासनाकडून सोडवायचे.पण नंतर आलेल्या 1 का ही सरपंचांनी दवाखान्यातील स्टाॅफ व डाॅक्टरसह अन्य समस्यांकडे लक्ष दिले नसल्यानेच आज हा दवाखाना एक पेशंट बनलाय.अशी चर्चा आहे.. हाळीसह परिसरातील शेकडो रोगी रोज येथे तपासणीसाठी येतात.पैकी अनेकांना पोठ, मान, पाठ, कंबर, डोके व छातीदुखी यासारखा आजार आहे. व या आजारांच्या बहूतांश पेशंट्सला “सिटीस्कॅन व एक्स रे” काढल्यावरच आतील समस्या,आजार समजु शकते असे सांगुन डाॅक्टर यासाठी उदगीर— लातुर या शहरातील तज्ञांकडे जावा. असे पेशंट्सला सांगतात. माञ येथे येणारा बहूतांश पेशंट हा गरीब आणि मध्यम मजुरवर्गातील असतात.म्हणुन अशा गरीब पेशंट्सकडे शहरातील महागडी “ट्रिटमेंट” परवडत नाही.तरी गरीब,गरजु पेशंटच्या गरीबीची जाण वरिष्ठांनी ठेवावी.व येथे वरील सगळी अत्यावश्यक असलेली सिटीस्कॅन व एक्स मशीन तसेच कोविड पेशंट्सना आॅक्सिजनची व्यवस्था करावी.अण् संपुर्ण स्टाॅफसह परमानंट व मुक्कामी (पुर्वी 5 होते) आता दोन डाॅक्टरची नेमणुक करावी.अशी रास्त मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here