लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
लोकाधिकार संघाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या लोकाधिकार दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी येडशी येथील रामेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार आणि वैकुंठवाशी रामकृष्णभाऊ व वैकुंठवाशी भगवान यांच्या समाधी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी संत शिरोमणी कालीपुत्र कालीचरण महाराज व मठाधिपती कैलास महाराज दिवाने यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
लोकाधिकार दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभ प्रसंगी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्यासह अनेक संत महात्मे, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, लोकाधिकार संघाचे पदाधिकारी, डॉक्टर प्रशांत पवार, डॉक्टर किरण झरकर, येडशीच्या सरपंच भाग्यवती, सोनिया, प्रशांत पवार, संगीता जायभाये, शिवसेनेचे अजित लाकाळ पाटील, हरिभक्त परायण भास्कर बप्पा महाराज सातेफळकर, हरिभक्त परायण शाहू महाराज ओगले, पवन सस्ते, शाम कदम सर, गजानन नलावडे, बाजीराव देशमुख, चंद्रकांत पवार, आर. पी. नलवाडे, महेश शेळके, सुयश शिंदे, गणेश काकडे, सुयोग शिंदे, आदी उपस्थित होते.

