उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे आयोध्या येथील श्री. राम मंदीरात मुर्ती स्थापनेचे निमंञणा च्या अक्षता कलश यांची शंभोमहादेव मंदीरापासुन भव्य शोभा याञा सबंध गावातुन ढोलताशांच्या व टाळम्रदंगा च्या गजरात तसेच फटाक्याच्या भव्य अतिषबाजीत काढण्यात आली होती व यावेळी जागोजागी कलश पालखी यांचे दर्शनासाठी मोठा भक्तवर्ग जमा झाला होता.तसेच महिला भक्तांतर्फे गावभर रांगोळी काढुन कलशाचे पुजन करण्यात आले.यावेळी “जय राम,श्रीराम जय जय राम ” अशा गगणभेदी घोषणा देण्यात आल्या. प्रभु श्रीराम हे वनवासात असताना हंडरगुळीत आले होते.व येथील तिरु नदीत स्नान करुन नदीतील रेतीतुन महादेवाची पींड बनवले व दर्शन घेतले होते.अशी एक अख्याईका आहे.तसेच श्रीसंतबंधू जळोजी — मळोजी महाराज यांची जन्मभुमी असल्याने संताची नगरी म्हणुन हंडर- गुळी गावाला अनन्यसाधारण म्हत्व आहे.आणी अशा या संतनगरी मध्ये रामभक्तांच्या प्रयत्नाने अक्षता अन् कलशाची भव्य अशी शोभा याञा / मिरवणुक वाजत-गाजत मेनरोडवरुन काढण्यात आली.यावेळी सबंध गावा मध्ये श्रीरामाचा जयजयकार रामभक्त करत होते,यावेळी कलश पालखीचे महिला भक्तांनी जागोजागी स्वागत व पुजन केले.यावेळी महिलाभक्तासह युवकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

