हाळी व हंडरगुळीतील सुज्ञ नागरिकांत चर्चा.
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर- लातुरचे कर्तबगार व ‘नाॅन करप्ट’ S.P. म्हणुन श्री.सोमयजी मुंडे हे जिह्यात ‘जाॅईन’ होताच.अवैध धंद्याविरुध्द तसेच शहर हद्दीतील शाळा,काॅलेज व ट्यूशन एरियात पोलीसांचे “चार्ली पथक” तयार करुन “कोंम्बिंग आॅपरेशन” हे अभियान सुरु केले.व यामुळे शहरी भागातील शाळा, काॅलेज, ट्युशनच्या एरीयात “सडकछाप गॅंगची” धरपकड सुरु केल्याच्या बातम्या विविध पेपर व सोशल मिडिया मधुन वाचनात आले.माञ हंडरगुळी ता.उदगीर.जि. लातुर या ग्रामिण भागातील छोट्या गावात असलेल्या गल्लीबोळांमध्ये तसेच शाळा,काॅलेज व बसस्थानक या परिसरात लगतचेच कांही ‘छप्परी’ व ‘सडकछाप गॅंग’ ही सतत ‘बाइक’ वरुन फटाका सायलेंन्सर, कर्णकर्कश हाॅर्न वाजवत हिंडताना दिसतात. अण् या ‘छपरी टोळीचा’ शाळा,काॅलेजला ये-जा करणा-यांना सर्वाधिक ञास होतो.तरी पण आजवर या ‘छपरी’ पोरांच्या टोळीवर कुणीही कसलीही कारवाही केली नाही.आणि करु ही शकत नाही ! अशी कुजबूज बाईक — वरुन सुसाट वेगात धिंगाणा करत हिंडणा-या त्या कांही ” छपरी पोरां ” मध्ये सुरु आहे.तेंव्हा खरोखरच या गावात ‘हिरोगिरी’ करणा-या त्या ‘छपरी पोरांवर’ कारवाही होणार की नाही.जर होणार असेलतर कधी.असे सुज्ञ जनतेत बोलले जात आहे..
कारण आज ग्रा.पं.असलेले हे गाव भविष्यात तालुका होऊ शकतो.आनी भविष्यात संबंधित प्रशासनाला ञास होऊ नये म्हणुन अशा घटनांवर आता पासुनच आळा घालणे गरजेचे आहे.. तसेच हंडरगुळीतील गल्लीबोळात व शाळा,काॅलेज,बसस्थानक परिसरात कांही ‘छपरी पोरं’ सुसाट वेगात आनी फटाका सायलंन्सर वाजवित बाईक्स पळविताना अनेकांना ‘कट’ मारतात.. तसेच या ‘छपरी गॅंग’ जवळ वेगवेगळे ‘माॅडेल’ ची विनानंबरची ‘बाईक’ येते कशी व कोठुन.कारण या पैकी कांही ‘छपरी पोरांकडे’ ना शेती,ना कोणता मोठा धंदा.तरीही दिड,दिड 2–2 लक्ष रुपयांची ‘बाईक’ उडवतात वापरतात कशी.यापैकी एखादी विनानंबरची बाईक चोरीची असु शकते.अशी चर्चा जाणकार हाळीहंडरगुळीकर करतात तेंव्हा शहरी भागात शाळा,काॅलेज व बसस्थानक परिसरात चार्ली पथक दक्ष ठेवुन सतत कोम्बिंग आॅपरेशन राबविणा-या व सडकछाप, छपरी गॅंग ची धरपकड करणा-या कर्तबगार SP सोमयजी मुंडे पोलीस अधिक्षक यांनी उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे व बाजारासाठी देशात सुप्रसिध्द असलेल्या हंडरगुळी या गावातील गल्लीबोळात व शाळा,बसस्थानक एरियात सतत दिवसराञी कर्णकर्कश हाॅर्न वाजवत हिंडणा-या सडकछाप, छपरी टोळींवर कारवाहीचा हिसका व ‘सुंदरी’ चा ‘प्रसाद’ देण्याची गरज आहे.अन्यथा या छपरीपोरांमुळे सामाजिक शांतता भंग होऊ शकते. तरी हंडरगुळी गावात व बसस्थानक तसेच शाळा,काॅलेज परिसरात सतत स्टंटबाजी करणा-या लोफर गॅंगवर कारवाही करावी.अशी मागणी सुज्ञ हाळी-हंडरगुळीकर नागरिकांची आहे विशेषत: या छपरी पोरांच्या ञासाला वैतागलेल्या भगीनींची विनंती आहे.. कर्तबगार पोलिसांना.

