ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात; चार जण जागीच ठार

0
215

मृतामध्ये बाप लेकाचा समावेश

बीड प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज

बीड : बीडच्या मांजरसुंबा नजीक अहमदपूर -अहमदनगर मार्गावर पिकअप व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पिकपमधील तिघेजण तर कंटेनरचा चालक जागीच ठार झाला. नितीन घरत, प्रल्हाद घरत, विनोद सानप अशी ठार झालेल्या तिघांची नावे आहेत.

अपघातानंतर कंटेनर मधील लोखंडी पाईप रस्त्यावर पसरल्याने वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. या मृतांमध्ये बाप लेकाचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात काल रात्री उशीरा झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताच्या घटनेने महाजनवाडीसह वाघीरा गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here