निशांत भसारकर
विशेष जिल्हा प्रतिनिधी,
गडचिरोली
गडचिरोली- आशा वर्कर व गटप्रवर्तक सरिता नैताम आशा वर्कर, गटप्रवर्तक आयटक संघटना जिल्हा सचिव व शालीनी भसारकर मडम यांनी म्हटले की आरोग्य मंत्री महोदय यांनी आश्वासन दिली होती. आशावर्कर यांना 7000 व गटप्रवर्तक यांना १० हजार रुपये मानधन देऊ या खोटारड्या आश्वासना मुळे आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना मानसिक त्रास असा होत आहे. याच कारण माननीय मंत्री महोदय यांनी मीडिया द्वारे व व्हिडिओद्वारे जगप्रसिद्ध केलं. गावातील लोकांना वाटतं की आशा वर्कर यांना 7000 व गटप्रवर्तक यांना दहा हजार मानधन मिळत आहेत तरी यांचा यांचा संप चालूच आहे. पण तसं काही नसून आशा व गटप्रवर्तकांनच ४ महिन्यापासून मानधन अजून मिळालं नाही आहे. आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना विश्वास होता की आम्हाला लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य होतील पण तसं झालं नाही.
दि. ९ /१/२०२४ माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्यात कार्यक्रमाला आल्यानंतर जबाब दो आंदोलन च्या माध्यमातून आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनी आठवण करून दिली की, आम्हाला लवकरात लवकर आमची बैठक घेऊन आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी विनंती केली
गडचिरोली जिल्ह्यातील आशा वर्कर आणि गटप्रवर्तक जिल्ह्याच्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येथे इथे येऊनही लवकर दखल घ्यावी अशी विनंती आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी केलेली असून यांची दखल किती दिवसात घेतात हे वेळेवर समजून येईल तोपर्यंत आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे आंदोलन व बेमुदत संप चालू राहील..

