सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष व सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, चंद्रपूर च्या रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १३ जानेवारी २०२४ ला राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल पडोली, चंद्रपूर येथे ‘आजची युवा पिढी आणि एच आय व्ही/एड्स या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेकरिता महावि द्यालयातील १८ विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी आजची युवा पिढी आणि एच आय व्ही/ एड्स या विषयाच्या अनुषंगाने आपली मते व्यक्त केली. या स्पर्धेचे परीक्षण श्री निखिलेश चामरे व त्यांचे सहकारी यांनी केले. वक्तृत्व स्पर्धे करता प्राचार्य मान. डॉ. जयश्री कापसे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रेम जरपोतवार द्वितीय स्वप्निल मेश्राम व तृतीय क्रमांक नितेश वाघाडे यांनी पटकविले. विजेता स्पर्धेकांना रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन प्राचार्य मा. डॉ. जयश्री कापसे व निरंजन मंगरूळकर (आयसीटीसी सुपरवायझर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच निरंजन मंगरुळकर यांनी या क्षेत्रात २३ वर्ष कार्य करण्याचा अनुभव व २००३ च्या आधीची एचआयव्ही ची स्थिती व आजची स्थिती कशी आहे. तसेच एच आय व्ही/ एड्स बाबत सांख्यिकी आकडेवारी सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या संपूर्ण वक्तृत्व स्पर्धेचे सूत्रसंचालन व आभार स्वप्निल मेश्राम यांनी केले व संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. देवेंद्र बोरकुटे यांनी जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमाकरिता संपूर्ण प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

