बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे मांजरा कारखाना व प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा सप्ताह -२०२४ अंतर्गत वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू असून असंख्य वाहने रस्ता वरून ऊसाची वाहतूक करत असतात. त्यामुळे संबंधित वाहनचालकांनी रस्ते वाहतुकीसाठी असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या निष्काळजीपणामुळे अपघात होवून एखाद्याचा जिव जावू नये यासाठी जनजागृती करत वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्यात आले. यावेळी सचिन बंग (मोटर वाहन निरीक्षक),
मंगेश गवारे (मोटर वाहन निरीक्षक)अक्षय काळे, अक्षय मुसळे, नरसगुंडे (सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक) यांच्या सह मांजरा कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी विनयकुमार टमके,प्रशांत शेळके ऊस पुरवठा अधिकारी व ऊस वाहतूकदार आदींची उपस्थिती होती.

