क्रिसिल फाऊंडेशन मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र यांच्या विद्यमाने व उमेद ग्राम संघ नवेगाव वाघाडे यांच्या पुढाकाराने बचत गटातील महिलांना व गावातील नागरिकांना आर्थिक साक्षरता अभियान

0
89

जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

क्रिसिल फाउंडेशन मनीवाईजवित्तीय साक्षरता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच उमेद ग्राम संघ नालेगाव वाघाडे यांच्या पुढाकाराने बचत गटातील महिलांना तसेच गावातील नागरिकांना आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात आले या अभियानामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा, सुकन्या, अटल पेन्शन अशा अनेक विविध योजनेचे लिंकेज करण्यात आले.
या अनुषंगाने गावात वित्तीय साक्षरता जनजागृती व लिंकेज शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यात शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजना, विमा तसेच ब्यांकिग व्यवहार व डिजिटल व्यवहार वित्तीय साक्षरता संबंधित क्रिसिल फाउंडेशनचे मनीवाईज वित्तीय साक्षरता केंद्र व्यवस्थापक भीमराज चांदेकर क्षेत्र समन्वयक सुमित रामटेके व गोपाल टोंगे यांनी सहकार्य केले शासनाच्या विविध योजनेची बँक ऑफ इंडिया गोंडपिपरी व गंगाराम तळोदी यांच्या माध्यमातून लिंकेज करण्यात आले.या कार्यक्रमाला गावकरी तसेच बचत गटातील महिलांची उपस्थिती होती.
सदर वित्तीय साक्षरता अभियानाला नवेगाव वाघाडे येथील सीआरपी कल्पना चाहारे तसेच उमेद अभियानातील सीसी सायनकर सर व इतर सदस्यांनी सहकार्य केले कार्यक्रमात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुकन्या योजना अटल पेन्शन योजना अशा विविध योजनांचे लिंकेज करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here