prabodhini news logo
Home उदगीर उदगीरच्या सा.बां.खात्यात एकही “मर्द” अधिकारी नाही का.? असेलतर हाळी – हंडरगुळीत पुन्हा...

उदगीरच्या सा.बां.खात्यात एकही “मर्द” अधिकारी नाही का.? असेलतर हाळी – हंडरगुळीत पुन्हा केलेले भव्य अतिक्रमण हटविणार कधी अपघात झाल्यावर का.? जनतेत चर्चा..

0
143

विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी

हंडरगुळी— अधिकारी कसा असावा, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे लातुरचे माजी i.p.s पोलीस अधिकारी निकेतन कदम कारण मनात आले तर व मानसिक इच्छाशक्ती जनसेवाच करायची.हीच मनोकामना उराशी बाळगुन लातुर जिह्यात आपल्या ” धडाकेबाज ” कामगिरीमुळे 2 नं.धंदेवाल्यांसह “करप्टेड” असलेल्या सरकारी नोकर- दारांच्या छातीत धडकी भरवणारे व ” खाकी ” ची “आण,बान,शान” उंच करणारे एक i.p.s अधिकारी ज्यांचे “दे_दणादण” कार्य बघुनच हाळी व हंडरगुळी सह परिसरातील जाणकार मंडळी त्यांना आजही आदराने मनाने खाकीवर्दीतला ” सिंघम ” असे म्हणत व सदा त्यांच्या कार्याची आवडीने स्तुती व आठवण करत आहेत.व येथे ही माहिती लिहण्यामागचा हेतू हा की गत उन्हाळ्यात हाळी,हंडरगुळी या 2 गावातुन गेलेल्या राज्यमार्गा शेजारी वाढलेले अतिक्रमण हटवुन 2 ही कडे सा.बां.ने गटारी बांधल्या.आणि कांही दिवसातच पुन्हा जि.प. शाळेच्या मेन व जुन्या गेटपुढे मटन विक्री सेंटर्स हे व अन्य व्यायसायीकांने पुन्हा जशास तसे अतिक्रमण केले.व या पेपरातुन बातमीद्वारे लक्ष वेधले असता P.W.D – सा.बां.खाते उदगीरचे संबंधित J.E. व अन्य अधिकारी हे येथे येऊन पुन्हा सा.बां.खात्याच्या जागेवर पुन्हा त्याच लोकांनी वाहतुकीस अडथळा आणी अपघातास कारण,निमित्त्य ठरेल असे भव्य अतिक्रमण केले आहे.हे पाहुन योग्य ती कारवाई करायला हवी असताना सा.बां.खात्याचे सर्व संबंधित अधिकारी हे “नामर्द”… !! असल्यासारखे उदगीरातच बसुन होते व आहेत.माञ i.p.s.निकेतन कदम या अधिका-यानी आमच्या बातमीची दखल घेतली व ” मर्द ” अन् सिंघम सारखी ” एंन्ट्री ” केली.आणि सर्वांनी आपापले अतिक्रमण काढले पण मर्द,सिंघम निकेतनजी कदम हे बढती व बदलीवर जाताच पुन्हा येथे सा.बां.खात्याच्याच शुभ आर्शिवादाने व सा.बां.खात्यात “देशपांडे” सारखा व कदम साहेबांसारखा एकही “मर्द” अधिकारी नाही.म्हणुनच आज जि.प कें.प्रा.शाळेच्या पुढे व आजुबाजुस अतिक्रमन करुन अवैध माॅंस विक्री सेंटर्स आणि अतिक्रमण वाढल्याचे दिसते.माञ सा.बां.खात्यात संबंधित अधिका-यांना दिसत कसे नाही.मर्द अधिकारी नाही म्हणुन ? का एखादा अपघात झाल्यासच दिसणार काय व अतिक्रमण काढणार काय.अशी चर्चा हाळी हंडरगुळीतील सुज्ञ व जाणकार मंडळी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here