अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला चेवनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप यांचा पाठिंबा

0
40

श्रीकांत राजपंगे
तालुका प्रतिनिधी जिवती

मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांकडून वारंवार आंदोलने करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. दरम्यान जिवती तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका हे देखील न्याय्य मागण्यांसाठी संपात सहभागी झाले आहे. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय शेवनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते सुदाम राठोड, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांनी भेट दिली. अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या मागण्या वाजवी असून त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करावे, वेतनश्रेणी, ग्रेच्यूईटी, भविष्यनिर्वाह निधी आदी लाभ देण्यात यावे आणि महागाई दराच्या वाढत्या निर्देशकांनुसार मानधन वाढ करावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असून सामाजिक चळवळींनी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आव्हान करण्यात आले. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या लक्ष्मीताई केंद्रे यांच्यासोबत शेकडो आंदोलक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here