हाळी येथे श्रीराम मंदीराच्या अक्षता वाटप संपन्न.दि.22 रोजी शोभायाञा

0
151

विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी

हंडरगुळी— करोडों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचे भव्यदिव्य मंदीर तेथे उभे राहत आहे.या पार्शवभुमीतुन आयोध्येतून आलेल्या अक्षतांचे हाळी ता.उदगीर येथे वाटप करण्यात आले. व दि.२२ रोजी निघणा-या कलशाची शोभायाञेत महिला,पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येनी सहभाग घ्यावा.अशी विनंती श्रीराम जन्मोत्सव समितीद्वारे हाळीकरांना करण्यात आली आहे.या प्रसंगी छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासुन अक्षता वाटपास प्रारंभ करण्यात आले.तसेच गावातील सर्व देवालयात अक्षता व पञीका देण्यात आली.यावेळी ढोलताशाच्या गजरात आणि “जय राम श्रीराम,जयजय राम “अशा गगणभेदी घोषणा देत शेकडो युवक व जेष्ठ मंडळी उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here