हळदी कुंकू, विविध स्पर्धेचे आयोजन
जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
महिलांनी एकांकिका नाटक, नृत्य, एक पात्री भूमिका सादर करून प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि फातिमा शेख यांच्या जयंतीचे औचित्याने मकर संक्रांती निमित्य राज राजेश्वर, गायत्री, महाकाली, श्री. संताजी, माऊली, सहेली, सखी, जिजाऊ, परिवार, रणरागिणी, सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रम तसेच महिलांच्या विविध स्पर्धा एकांकिका नाटक, एकपात्री नाटिका शिवमंदिर बगीचा बाबूपेठ येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षा चंदा वैरागडे, संस्थापक अध्यक्ष महिला बचत गट, प्रमुख अतिथी अनिता बोबडे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका, सारिका कुचनकर शिक्षिका, यशोधरा पोतनवार सामाजिक कार्यकर्त्या कामिनी बावणे सामाजिक कार्यकर्त्या, सोनम मडावी लोकमत सखी मंच जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, सर्वप्रथम उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच स्वागत नृत्य, तृप्ती राजूरकर, स्पर्शू राजूरकर यांनी करून स्वागत करण्यात आले.मकर संक्रांत निमित्य संगीत खुर्ची, विविध स्पर्धा घेण्यात आल्या, त्यानंतर एकपात्री नाटिका स्पर्धेत सावित्रीबाई फुले यांची भूमिका चंदा वैरागडे यांनी तर ज्योतिबा फुले यांची भूमिका त्यांचे पती मनोज वैरागडे यांनी केली.मोबाईल चे दुषपरिणाम वर आधारित अतिशय उत्तम एकांकिका नाटिका स्नेहल अंबागडे, कांचन लेंडागे लीला बुटले, तेजु पोडे, राणी लेंडागे,नम्रता मोरे, सुरेखा बुटले शीतल लेंडागे, इत्यादी महिलानी वेगवेगळ्या वेशभूषेत सादर करून उपस्थित महिला प्रेक्षकाना मंत्रमुग्ध केले. शिक्षक सेवानिवृत्त सरोज चांदेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर्णा धकाते यांनी केले,उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन मोलाचे मार्गदर्शन केले,कार्यक्रमाच्या अध्यक्ष चंदा वैरागडे यांनी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांच्या अंगी असलेले कला गुणाना वाव मिळावा तसेच कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे स्टेज डेरिंग आणि त्यांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे समाजात वावरताना कुठल्याही कठीण प्रसंगाला त्या घाबरू नये यासाठीतच दरवर्षी आम्ही अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो आणि मोठ्या संख्येने महिला प्रत्येक स्पर्धेत स्व खुशीने सहभागी होतात याचा खरोखरच मला आनंद आहेत असे मनोगतातून व्यक्त केले, तब्बल पाच तास चाललेल्या कार्यक्रमाला महिलांची भरगच्च उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोज चांदेकर व आभार शुभांगी कंदलवार यांनी केले. उपस्थित सर्व महिलांना चंदा वैरागडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन परीचयाचे पुस्तक मकरसंक्रांत निमित्य वाटप करून हळदीकुंकू कार्यक्रम आटोपून शेवटी सर्वाना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला बचत गटातील सर्व महिलांनी सहकार्य केले.

