प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
अदानी कौशल विकास केंद्र चांदा सिमेंट वर्क घुग्गुस द्वारा आयोजित तीन दिवसीय रोजगार मेळावा आणि करियर मार्गदर्शनचे आयोजन करण्यात आले. कंपनी चे सामाजिक दायित्व या योजने अंतर्गत सक्षम ही योजना चालवली जाते. ही योजना युवकांना आरोग्य विभाग, कॉम्प्युटर विभाग, महिलांना झाडू व मसाले उद्योग, शिलाई मशीन व महिला बचत गटांना सक्षम करण्याचे कार्य करते. मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. पियुष मेश्राम सर प्लेसमेंट ऑफिसर, जनता महाविद्यालय,चंद्रपूर अतिथी म्हणून उपस्थित होते सोबतच डॉ राकेश चव्हाण सर (हिंदी विभाग जनता महाविद्यालय आणि शुभांगी नगराळे मॅडम (सेंटर प्रमुख- अदानी कौशल्य विकास केंद्र चांदा) हे मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी जनता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चमूने देखील रोजगार मेळाव्यात उपस्थिती दर्शविली. तसेच चंद्रपूर व घुगुस परिसरातील गरजवंत विद्यार्थ्यांनी देखील या मेळाव्यात सहभाग घेतला.
तीन दिवसीय रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील 350च्या वर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबतच ऑनलाईन पध्दतीने 200 च्या वर विद्यार्थ्यांचे मुलाखती घेण्यात आल्या.
रोजगार मेळाव्याच्या यशस्वी करण्यासाठी शुभांगी नगराळे (सेंटर प्रमुख- अदानी कौशल्य विकास केंद्र चांदा), हितेश डोर्लीकर (एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग), अमित उईके(ट्रेनर), सुमित दहीकर, श्री नंदकुमार ढेगंणे(जेष्ठ नागरिक संघ, घुगुस) व इतर सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

