
संकल्पना प्रशांत रामटेके
आज प्रजासत्ताक दिन आपल्या भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस 26 जानेवारीला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. या दिवसाला आपल्या राष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे.कारण हा दिवस खऱ्या अर्थाने अधिकृतपणे प्रजासत्ताक बनला होता. 26 जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटना अमलात आली.ज्याने नागरिकांना हक्क आणि स्वातंत्र्य दिले.
अनेक धर्म, जाती, पंथ ,जमाती यांचा समावेश असलेल्या आणि एकात्मतेच्या धाग्याने बांधलेला आपला देश विविधतेने नटलेला देश आहे.म्हणूनच आपण दरवर्षी 26 जानेवारी हा राष्ट्रीय सण सारे भारतीय मिळून एकोप्याने साजरा करतो.आपली राज्यघटना ही देशाची सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना आहे आणि ती अभिमानास्पद आहे.ज्यांची निर्मिती डॉ.बी .आर .आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात पूर्ण करून त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू कडे सुपूर्द केली. आणि 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.
प्रजासत्ताक दिनी जेव्हा तिरंगा फडकविला जातो तेव्हा विविधतेतील एकतेचे जन..गण..मन. ..हे राष्ट्रगीत आपल्या कानात गुंजत असते ,तेव्हा खरंच एकोप्याची भावना निर्माण होते.या देशासाठी काहीतरी सत्कर्म करण्याची जिद्द निर्माण होते. हा दिवस साजरा करीत असताना आपले हृदय अभिमानाने आणि कृतज्ञतेने फुलते.अखंड लोकशाही आणि सार्वभौम भारताची कल्पना करणाऱ्या आमच्या स्वातंत्र्यसैनिकांची, पूर्वींच्या नेत्यांच्या आदम्य भावनेला उजाळा मिळतो.हा एक दिवस जेव्हा आपण आपल्या लोकशाहीच्या सामर्थ्याची आणि आपल्या संविधानात अंतर्भूत केलेला आदर्शाचे उत्सव साजरा करताना मनात आपली राज्यघटना एक उल्लेखनीय दस्तऐवज आणि आपल्या महान राष्ट्राचा पाया आहे हे स्पष्ट होते.आमचे हक्क आणि स्वातंत्र्य ती प्रदान करते आणि आम्हाला न्याय दिला जातो .हा प्रजासत्ताक दिन साजरा करताना एका राष्ट्रासाठी आपण केलेली प्रगती त्याचा विचार मनात येतो.प्रजासत्ताक दिनाला आपल्या स्वातंत्र्यासाठी अथक लढा देणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण केल्याचाही हा दिवस आठवण करून देतो.या प्रजासत्ताक दिनाला आपण एक जबाबदार नागरिक म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवायलाच पाहिजे.आपल्या राज्यघटनेतील तत्त्वाचे पालन करणे आणि न्याय व समाजासाठी कार्य करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.आपण प्रत्येक नागरिकांच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याच रक्षण करण्यासाठी आणि सर्व समुदायांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे .आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आपल्या परंपरा आणि लोकशाही प्रती आपली बांधिलकी याचा अभिमान करणे, अभिमान बाळगणे आणि एक मजबूत आणि अधिक समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी शपथ घेऊन पुढे पुढे जाऊया.या प्रजासत्ताक दिनी आपण सगळे स्वतःला न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाच्या आदर्शाकडे नेऊयात आणि अशा भारतासाठी प्रयत्न करूया जिथे प्रत्येक नागरिक सन्मानाचे आणि परिपूर्ण जीवन जगू शकेल.एकत्रितपणे आपण एक मजबूत अधिक समावेशक राष्ट्र निर्माण करू.सध्या या देशात अनेक प्रश्नांनी वेढा घातलेला आहे. तरुणांवर उद्भभवलेली बेकारी, शिक्षणाचा बदलता आलेख ,मराठी जिल्हा परिषद शाळेचे घटते प्रमाण , जगाचा पोशिंदावर वेळोवेळी येणारे संकट आणि अशा कितीतरी समस्या भेडसावत आहेत .आणि म्हणूनच यांच्यासाठी अधिक चांगले कार्य करून प्रत्येकाला न्याय द्यायला हवा . तेव्हाच आपला भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करेल.

लेखिका – संगीता राजेश नागदिवे
यवतमाळ














