जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढा येथे सांस्कृतिक स्नेहसमेलन व शिक्षकांचा सत्कार सोहळा

0
71

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर- 75 वा गणराज्य या निमित्त इयत्ता एक ते पाच वी तील सर्व विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्यांनी सादर केलेले कला कौशल्य पाहून सर्व गावकऱ्यांचे नेत्र दीपलेत. मंचावरील आदरणीय पाहुन्यांनी कौतुकास्पद उद्गार काढले. सदर शाळेतील कार्यरत शिक्षक श्री सुदर्शन रामकृष्ण नैताम मुख्याध्यापक व प्रवीण उत्तमराव मडावी सहाय्यक शिक्षक यांचे गावाला लाभलेले योगदान व विद्यार्थ्यांत बदल झालेली शैक्षणिक स्थिती बघून गाववासियांच्या वतीने किशोर पा. वरारकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला व त्यांना पुढील काम करण्यास नवचेतना निर्माण करून देण्यात स्नेहरुपी आशीर्वाद दिले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मा. किशोर पा. हागे अध्यक्ष तंटामुक्त समिती वढा, कार्यक्रमाचे उद्घाटक मा.किशोर पा. वरारकर सरपंच ग्रामपंचायत वढा व सर्व सदस्यगण, प्रमुख अतिथी मा. अशोक पा. हागे अध्यक्ष व सर्व सदस्यगण शा.व्य.स. वढा, विशेष अतिथी म्हणून सौ सुनीता बंडूजी कोडापे महिला आघाडी अंबुजा फाउंडेशन तथा नगरसेविका गडचांदूर , पालकवर्ग कार्यक्रमाचे भोजन दाते मा.साईनाथ पा. येलमुले, महेंद्र पा. जेनेकर, प्रवीण पा. गोरे हे विशेष आकर्षक ठरले. मंदा भगत, भावना नैताम, प्रिया मडावी, मंगला दुर्वे, सुवर्णा निंदेकर, कोमल ताडे, आरती दुर्वे, विद्या पवार, संगीता येलमुले, सविता पडाळ, शीतल जेनेकार, रविता वरारकर, सोनू वाढई, सुधा पवार,या महिलांनी शालेय विद्यार्थ्यांना विशेष योगदान दिले. गावातील सर्व पालकांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. प्रवीण मडावी सहाय्यक शिक्षक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व शाळेचे मुख्याध्यापक यांनी उपस्थितानचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here