हंडरगुळी येथे फार्मासिस्टविना चालू आहे एक मेडीकल
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर – हंडरगुळी औषधी मेडीकल दुकाण टाकण्यासाठी फार्मा सिस्टची डिग्री हवी. माञ हंडरगुळी ता.उ दगीर या गावात गत कित्येक वर्षापासुन एक मेडिकल दुकाण फार्मासिस्टविनाच 10 वी.पासच्या 2 मुनिममंडळी चालवतात.आणि याची परवाच कांही पेपरात बातमीद्वारे सत्य माहिती छापुन आली होती.तरी पण लातुर जिल्ह्याचे D.i.म्हणजे ड्रग ईन्सपेक्टर यांना कारवाई करावेसे वाटत नाही.म्हणुन गजाननाचा D.i. ला आर्शिवाद आहे का? D.i. चा गजाननाला आर्शिवाद आहे? असा सवाल जाणकार हंडरगुळीकरातुन चर्चीला जात आहे. गल्ली ते दिल्ली मेडिकल स्टोअर्स सूरु करायचे असेल तर फार्मासिस्ट ही पदवी हवी.मगच दुकाण टाकता येते.तसेच कुणीही ऐरागैरा मेडीकल चालवू शकत नाही. तसेच पत्नी जर Dphrm डि फार्म असेल तर पतीला व पती डि फार्म केलेला असेल तर पत्नीला मेडीकल चालवता येत नाही. माञ हंडरगुळीतील एक मेडीकल दुकाणदार हा गत कित्येक वर्षापासुन स्व:ता न बसता बायको व 2मुनीमांना दुकाणात बसवुन विविध मेडिसिन कंपनी द्वारा आयोजित टुरवर जातो. तेंव्हा तो कधी व किती दिवस स्व:ता च्याच मेडीकल मध्ये गैरहजर होता. व त्या दरम्यान दुकाणात कोण बसत होते. म्हणजे दुकाण कोण चालवत होते.तसेच ग्राहकांना बिलाची पावती कुणाच्या सहीने देत होते.या सगळ्या प्रकरणाची सत्यता जाणण्यासाठी व खरा फार्मासिस्ट महिण्यातुन कितीदा मेडीकल मध्ये बसतो. व किती दिवस दौ-यावर असतो,याची पाहणी करुन येथील फार्मासिस्टविना चालणा-या त्या मेडीकलवर कारवाई करायची धमक ड्रग ईन्सपेक्टर मध्ये आहे का? असेल तर मग गजाननाचे C.C.T.V. ड्रग ईन्सपेक्टर तपासणार का व कधी असे प्रश्न चर्चीले जातात.कारण गेली कित्येक वर्षापासुन 1 मेडीकल स्टोर्स फार्मासिस्टविना सर्रासपणे चालत असल्याचे जनतेला दिसते. माञ ड्रग ईन्सपेक्टरला दिसत कसे नाही.या मागचे कारण काय.”मनी” तर नाही? आणि फार्मासिस्टविना चालणा-या “गजानन” चा आर्शिवाद डी.आय.ला का,डी.आय.चा “गजानन” ला ? याचा शोध वरिष्ठांनी तरी लावावा.व फार्मा- सिस्टविना सताड,बिनधास्तपणे चालू असलेल्या मेडीकल स्टोर्सवर कडक कारवाई करावी.अशी मागणी अन्न व औषधी प्रशासन मंञी धर्मराव अञाम यांच्याकडे कांही जागरुक मंडळी करायच्या तयारीत आहेत. असे कळते.

