नेहरु युवा केंद्र लातुर जिल्हा स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्यपदी रामेश्वर चावरे यांची निवड.

0
51

बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज

नेहरु युवा केंद्राच्या युवा कार्यक्रमावरील जिल्हा सल्लागार समितीच्या सदस्यपदी लातूर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव रामेश्वर धनराज चावरे डिगोळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या शिफारशीवरुन ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे महानिदेशक नितेशकुमार मिश्रा यांनी रामेश्वर चावरे यांना पाठविले आहे. युवकांच्या विकासाशी संबंधित महत्वपूर्ण बाबीवर मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी ही समिती आहे. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. यानिवडीबद्दल लोकसभा प्रभारी राहुल केंद्रे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, भाजपा नेते नामदेवराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष पंडितराव सुर्यवंशी, डॉ विजय बिरादार, प्रदेश सचिव युवराज पाटील, सचिन अनसरवाडे, प्रसाद पाटील, महेश भंडारकोटे, अजय पोलकर इत्यादी जणांनी अभिनंदन केले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here