उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर तालुक्यातील मौजे,हाळी येथे महाराष्ट्र ग्रामीण बॅंक असुन,या बॅंकेत हाळीहंडरगुळी आनी परिसरातील अनेक गावातील हजारो नागरिकांचे अकाऊंट आहे.तसेच या भागातील अनेक महिला बचत गटांचे पण अकाऊंट आहे.म्हणुन वयस्करां- सह मायमाऊल्यां गटाच्या व्यवहार करण्यासाठी या बॅंकेत येतात.पण या बॅंकेत येणा-या मायमाऊल्यांसाठी स्वच्छताग्रह नसल्याने त्यांची मोठी कुचंबणा व गैरसोय होते.व कुठे करावी लघूशंका.असा सवाल एक – मेकींना महिलावर्ग विचारतात.तेंव्हा संबंधितांनी याचा विचार करावा.व स्वच्छताग्रहांची सोय करावी.अशी मागणी महिला ग्राहकांतुन होत आहे. तसेच सेम हिच गत DcC बॅंकेची पण आहे.तरी दिवसाढवळ्या महिलांना उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे. तेंव्हा पुढारलेले गाव असलेल्या हाळी येथील पुढा-यांचे पण या म्हत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष का?असा प्रश्न बॅंकेत ये-जा करणा-या महिलां विचारतात.. खुपवर्षापासुन हाळी या गावात सर्व पक्षाचे लहान – मोठे अनेक पुढारी आहेत.म्हणुन या गावाला पुढारलेले गाव म्हणणे चुक ठरु नये.पण याच गावात असलेल्या बॅंकेत महिलांसाठी स्वच्छताग्रह असायला पाहीजे.म्हणुन एकाही पुढा-याने लक्ष का दिले नाही. कारण धुष्ठपुष्ठ पुरुषांसह बचत गटाचे महिला व वयस्कर मंडळींचे अकाऊंट या बॅंकेत आहेत.म्हणून बॅंकीग बिझ – नेस करीता रोज शेकडो महिला बॅंके मध्ये ये-जा करतात.परंतू या बॅंकेमध्ये स्वच्छताग्रह तर नाहीच नाही.पण पिण्याच्या पाण्याची सुध्दा व्यवस्था नाही.आणि या दोन्ही सुविधांची सक्त गरज असतानाही बॅंकवाले व पुढारी म्हणवुन मिरवणारे यांचे ही या अत्यंत जिव्हाळ्याच्या मुद्याकडे लक्ष का गेले नाही.असा सवाल महिला ग्राहकांतुन चर्चीला जातोय.पाणी व स्वच्छताग्रह नसल्याने महिलांना व वयस्करांना दुरवर जावे लागते.व ऊघड्यावर लघूशंका करावी.लागते.यात महिला भगिनींची मोठी मानसिक कुचंबणा होते.तरी महिलांची वर्षानुवर्षापासुन होणारी गैरसोय व कुचंबणा लक्षात घेणार कोण.व स्वच्छताग्रहासह पिण्याच्या पाण्याची सोय करणार कोण.बॅंकवाले का पुढारलेल्या हाळी गावचे पुढारी.असा प्रश्न जाणकार मंडळीतुन चर्चीला जात आहे..

