कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
तहसिल कार्यालय सिंदेवाही सभागृहात संजय निराधार अनुदान योजना समितीची सभा दि.31/01/2024 ला दुपारी 12 वाजता आयोजीत करण्यात आली होती. समितीसमोर योजनेकरिता अनुदान मिळणेबाबत प्राप्त झालेले अर्ज मंजुर / नामंजूर करण्याकरिता संजय गांधीनिराधार योजना समितीच्या अध्यक्ष कमलाकर सिध्दमशेट्टीवार, सचिव तथा नायब तहसीलदार मंगेश तुमराम व इतर सदस्या समोर ठेवण्यात आले.
1) संजयगांधी निराधार अनुदान योजनांची अर्ज पैकी 46 अर्ज पैकी मंजुर 45 अर्ज नामंजूर 00 तृटीमध्ये 01 अर्ज
2) इंदीरागांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना एकुण प्राप्त 18 अर्जापैकी मंजुर 17 अर्ज नामंजूर 0 तृटीमध्ये 01 अर्ज
3) इंदीरागांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना एकुण प्राप्त 00 अर्जापैकी मंजुर 00 अर्ज नामंजूर 0 तृटीमध्ये 00 अर्ज
4) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना एकुण प्राप्त 83 अर्जा पैकी मंजुर 66 अर्ज नामंजुर 08, तृटीमध्ये 09 अर्ज
5) इंदिरागांधी राष्ट्रीय वृधापकाळ निवृत्ती वेतन योजना एकुण प्राप्त 23 अर्जापैकी मंजुर 16 अर्ज 03 नामंजूर तृटीमध्ये 04 अर्ज
एकुण प्राप्त 170 अर्जापैकी 144 अर्ज मंजुर 11 नामंजूर, 15 अर्ज तृटीमध्ये आहेत. या बैठकीला नायब तहसीलदार मंगेश तुमराम, कटकमवार, रामटेके, समिती अध्यक्ष कमलाकर सिध्दमशेट्टीवार,मुरलीधर मडावी,किशोर भरडकर, हाडगे मॅडम, अरुण सहारे, कोठेवार हे उपस्थित होते.

