प्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालय व क्रिडा संकुल या विकासकामांचे समावेश
रविंद्र मैंद
ब्रम्हपूरी तालुका प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नांतुन ब्रम्हपूरी शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे पुर्णत्वास आली असुन काही विकासकामे प्रगतीपथावर आहेत.
या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उद्या दि. ३ फेब्रुवारी रोजी शनिवारी, दुपारी २ वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
ब्रम्हपूरी तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा (१२ कोटी ३६ लाख रुपये, ब्रम्हपूरी शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा(१० कोटी १० लाख रुपये, ब्रम्हपूरी शहरातील क्रिडासंकुलाचा लोकार्पण सोहळा(६ कोटी ६८ लाख रुपये, ब्रम्हपूरी येथील तहसील कार्यालयासमोरील दर्शनीय भागाचे सौंदर्यीकरण करणे(२ कोटी रुपये), ब्रम्हपूरी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन(२८ कोटी रुपये), ब्रम्हपूरी शहरातील क्रिडा संकुलाम़ध्ये इतर सुविधा तयार करण्याच्या कामाचे भुमीपुजन करणे(१० कोटी ३६ लाख रुपये) या विकासकामांचा यामध्ये समावेश असणार आहे.
नागरिकांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

