परशुराम आर्थिक विकास महामंडळावर राजकीय नेत्यांना विरोध-अभिजीत आपटे

0
141

मुंबई प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

मुंबई: देवेंद्र फडणवीस सध्या ब्राह्मणांना खुष करण्यासाठी महामंडळाची खिरापत वाटत आहेत. ब्राह्मण नेत्यांना प्रस्ताव दाखल करण्याच्या सुचना दिल्यामुळे भाजपा नेते महामंडळावर जाण्याची तयारी करत आहेत. शिंदे गटाच्या शिवसेना आमदार मा मनिषा कायंदे यांचे अभिजीत आपटे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच परशुराम सेवा संघाचे काही कार्यकर्त्यांनी श्रेय घेण्यावरून आपटे यांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच सर्व ब्राह्मण संघटनांना राजकीय पुढारी परशुराम आर्थिक विकास महामंडळावर जावू देण्यास विरोध करा असा इशारा दिला आहे.
तसेच जर ब्राह्मण संघटनांनी राजकीय नेत्यांच्या विरोधात भूमिका जाहीर न केल्यास अभिजीत आपटे हे मागासवर्ग आयोगाकडे तक्रार करून ब्राह्मण समाजाच्या आर्थिक मागासलेपण पुनरसर्वेक्षणाची मागणी करणार आहेत.तसेच ब्राह्मण संघटनांनी भुमिका न मांडल्यास गरज पडल्यास मागासवर्ग आयोगासमोर आपण आंदोलन करू असा इशारा ही दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here