सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद (छ.संभाजीनगर) या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय कविसंमेलन व जगतगुरू श्री. संंत सेवालाल महाराज जयंती उत्सव नेपाळ, काठमांडू येथे दिनांक १४फेब्रुवारी २०२४ला आयोजित केलेला आहे,तरी संयोजक समितीने मा.शोभा वेले,यांची कविसंमेलन प्रमुख पाहुणे म्हणून निवड केलेली आहे.
त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आदर्श समाजसेविका पुरस्कार जाहीर केलेला आहे.
त्यांच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा.डाॅ.संघर्ष बळीराम सावळे हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स सोसायटी स्टुडंट्स ॲम्बेसेडर ऑफ स्कॉटलंड संस्थापक साहित्यधारा बहुउद्देशीय संस्था औरंगाबाद हे आहेत. अनेक नामवंत साहित्यिकांचा या संमेलनात समावेश आहे.

