नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार यांचा उपक्रम
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही येथील नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार यांनी आपल्या वाढदिवसाचे उचित्य साधून मतदान रुपी आशीर्वादातून जनसेवेची संधी उपलब्ध करून देत नगरसेविका पदापर्यंत पोहोचविणाऱ्या आपल्या प्रभागवासीय महिलाना भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा केला.
नगरपंचायत सिंदेवाही – लोनवाहीच्या प्रभाग क्रमांक 13 च्या नगरसेविका वैशाली संजय पुपरेड्डीवार यांचा वाढदिवस होता. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सिंदेवाही नगरातील विविध विकास कामांची भूमिपूजन तथा लोकार्पण सोहळा पार पडला. याच दरम्यान देवयानी इंटरनॅशनल स्कूल येथे नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार यांचा वाढदिवस विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यानंतर नगरसेविका वैशाली पूपरेड्डीवार यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 13 मधील महिलांना भेटवस्तू देऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. गेल्या अनेक दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून वैशाली पूपरेड्डीवार तथा त्यांचे पती सेवा सहकारी संस्था अध्यक्ष गुंजेवाही संजय पुपरेड्डीवार यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात गरजवंतांना मदतीचा हात देत स्तुत्यक्रम राबविला आहे.

