भाजपचे माजी नगरसेवक सागर आमले यांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

0
182

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

देशात महागाईने कळस गाठला असून सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण झाले आहे. युवकांना मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची झळ बसत आहे. त्यामुळे नागरिकांचा कल आता मोठ्या प्रमाणात काॅंग्रेस पक्षाकडे वाढलेला दिसून येते आहे.

ब्रम्हपूरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे सुरू असुन ब्रम्हपुरीची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू आहे. येत्या काळात विकसित शहर म्हणून ब्रम्हपूरी पुढे येणार आहे. हे सर्व राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नामुळे होत आहे.
त्यामुळे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केलेल्या विकासकामांवर व त्यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून ब्रम्हपूरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सागर आमले यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
ब्रम्हपूरी येथे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. सागर आमले हे ब्रम्हपुरी नगरपरिषदेची निवडणूक भाजपा पक्षाकडून लढले होते. त्यात ते विजयी झाले. मात्र भाजपाला राम राम ठोकत त्यांनी आता काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
याप्रसंगी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य देविदास जगनाडे, गडचिरोली काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी नगरसेवक डॉ.नितीन उराडे, जिल्हा काॅंग्रेसचे उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here