वेडगांव येथे मन हादरून टाकणारी घटना
कचरू मानकर
विशेष तालुका प्रतिनिधी
प्रबोधीनी न्यूज, गोंडपिंपरी
वेडगांव -लाठी उप -पोलीस स्टेशन अंतर्गत वेडगांव इथे दिनांक 15/02/2024 ला रात्रौ च्या सुमारास पतीने पत्नी लाता दामोदर धुडये वय 42 यांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून निघरून हत्या केली आहे. यातील आरोपी पती दामोदर मारोती धूडसे हा घटनास्थळावरून फरार झालेला आहे या हात्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
गावात अत्यंत शोकाकुल वातावरण पसरलेले आहे. आरोपीच्या शोधसाठी चार पोलीस पथके चंद्रपूर येथे हजर झालेले असून आरोपी अद्यापही पोलीसांना सापडलला नाही. पुढील तपास वेडगाव – लाठी उपपोलीस स्टेशन अंतर्गत चौकशी सुरू आहे.

