प्रकाश आंबेडकरांचा दावा
अकोला प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
अकोला: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. असा दावा त्यांनी अकोल्यात बोलताना केला आहे.
मनोज जरांगे यांना दिली जाणारी औषधं, जेवण, इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासूनच द्यावीत, अशी मागणी आंबेडकरांनी सरकारकडे केली आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही लोकांपासून धोका आहे. मात्र, याच्यामागे नेमकं कोण आहे ते सांगणार नाही?, असं आंबेडकरांनी म्हटलंय.