बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी येथील उदगीर नळेगाव लातूर या राज्य महामार्गावर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत व मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्याने महाराष्ट्र राज्य सरकार मराठा आरक्षणाचा विचार करत नसल्याने व सगेसोयरे बाबतच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी दि.18/02/2024 रोजी रविवारी दोन तास मराठा बांधवांनी रास्तारोको केले आहे.
यावेळी भाकसखेडा येथील चेअरमन विवेक जाधव.रामदास जाधव. सुदर्शन घोगरे.त्यात्याराव बिरादार.प्रविण जाधव. नामदेव मुळे. ज्ञानोबा कंजे.दिलीप होनाळे. नामदेव बेंडगे.बाळराजे. आदींनी मनोगत व्यक्त केले.
या परिसरातील हेर. करडखेल.भाकसखेडा. कुमठा. वायगाव. सताळा बु. डिगोळ. डिग्रस. करवंदी. लोहारा.या परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी या करडखेल पाटी येथील रास्तारोको ला उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत यांनी भेट दिली असून उदगीर ग्रामीण पोलीस निरीक्षक अरविंद पवार. पि. एस. आय.तारु. मोहिते. पोलीस हेडकॉन्स्टेबल एस.डी. भिसे. डि.बी. घोरपडे. डि.एच.बी. दुबळगुंडे. आर.पी.पी. फलाटून एक.होमगार्ड नागेश स्वामी.बळीराम सुर्यवंशी आदींनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.वहातुकदाराना व प्रवाशांना त्रास होवू नये तसेच अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी उदगीर ग्रामीण पोलीस सानी येरोळमोड पर्यंत पोलीस कर्मचारी तैनात केले होते.
फोटो ओळ- उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी चौरस्त्यावर मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दोन तास विविध मागण्या साठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

