प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
राष्ट्रिय चर्मकार महासंघ युवा जिल्हा अध्यक्ष म्हणुन कार्यरत असलेले चंद्रपूर येथील रहिवाशी प्रणय बसेशंकर यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड व संबा वाघमारे विदर्भ अध्यक्ष यांनी वणी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन, विदर्भ युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दि.१५ फेब्रुवारी२०२४ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कल्याण मंडपम वणी येथे पार पडलेल्या संतरविदास महाराज जयंती तसेच समाज प्रबोधन मेळावा व नियुक्तीपत्र वाटप सोहळा माजी समाज कल्याण मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रिय अध्यक्ष बबनरावजी घोलप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे,राष्ट्रीय सचिव दत्तात्रय गोतीशे,राष्ट्रीय प्रवक्ते रवींद्र राजुस्कर,प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड,प्रदेश निरीक्षक गजानन भटकर,प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर पानझाडे,संपर्कप्रमुख पश्चिम विदर्भ व विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमा खंडाळे,चंद्रपुर जेष्ठ जिल्हा अध्यक्ष हरीभाऊ घोरे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विप्लव लांडगे, कर्मचारी अधिकारी जिल्हा अध्यक्ष पुष्पकुमार मेंढे, चंद्रपूर युवती जिल्हा अध्यक्षा कु. भागेश्री हांडे, चंद्रपुर शहर अध्यक्ष चेतन लांडे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष महेश लिपटे सर, यवतमाळ युवा जिल्हा अध्यक्ष वैभव उपाध्ये यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रणय बसेशंकर यांना नियुक्तीपत्र देऊन विदर्भ अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल चंद्रपूर जिल्यातील समस्त चर्मकार समाजाने त्यांचे अभिनंदन केले.

