हंडरगुळी येथील गल्लोगल्लीत माकडांचा गोंधळ आणि शेतशिवारात धिंगाणा

0
113

उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

उदगीर तालुक्यातील हंडरगुळी गावातील अनेक गल्ली मध्ये माकडांनी गोंधळ घातला आहे. तर कांही माकडांनी शेत शिवारात धिंगाणा घातला असल्याचे दिसुन येते.माकडांच्या या गोंधळामुळे घराच्या पञावर,टेरेसवर वाळायला ठेवलेले अन्नधान्यासह कपड्यांची व शेतात उभी असलेल्या पिकांची वाट लागत आहे.अशी चर्चा महिलाभगीनी व शेतकरी करत आहेत..
या माकडांमुळे बच्चेकंपनीसह बुर्जूग, वयस्कर मंडळी मध्ये भय पसरले आहे.कांही माकडांची गॅंग हंडरगुळी गावातील बहूतांश गल्लीत गोंधळ व शिवारात धिंगाणा करत असल्यामुळे त्यांची दहशत पसरली आहे.व यामुळे बहूतांश बच्चेलोग व वयस्कर घरातुन बाहेर पडायची डेअरींग करत नाहीत. म्हणुन गल्लीत गोंधळ व शेतशिवारा – मध्ये धिंगाणा करणा-या माकडांचा बंदोबस्त कोण करणार?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here