छ. संभाजीनगर प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
अखंडहिंदूस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करीत कृपाळू वृध्दाश्रमात शिवजंयती उत्साहाने साजरी करण्यात आली. हनुमान टेकडीच्या पायच्याशी असलेल्या कृपाळू वृध्दाश्रमात सकाळी १०:३२ वाजता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आजी- आजोंबा सोबत परिसरातील नागरिकांनी अभिवादन केले. याप्रसंगीकृपाळू वृध्दाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संतोष (अण्णा) सुरडकर यांनी शिवाजी महाराजांचा आदेश घेऊन यापुढे स्वराज्य टिकवले पाहिजे व सद्यस्थितीत वृध्दांना घराबाहेर काढण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता चिता व्यक्त केली, याठिकाणी प्रा. नितीन गायकवाड, व्यवस्थापक के. टी. निरभवणे यांनी अभिवादन सभेत शिवाजी महाराजांचे चरित्र वृध्दांना समजावून सांगितले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा राजश्री डोंगरे, मयुर सुरडकर, अशोक बोरसे, रंजना सुरडकर व कृपाळू वृध्दाश्रमातील आजी-आजोबां सोबत परिसरातील नागरिक उपस्थित होते.

