
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
9168369784
नागपूर- मागील अनेक दिवसापासून आम आदमी पार्टी शहर कार्यालयामध्ये शेकडो नागरिकांनी होत असलेल्या त्रासाबद्दल आपली व्यथा मांडली. आणि नगर भूमापन कार्यालयात सामान्य नागरिकांच्या जागेचे फेरफार हे खूप दिवसा पासून प्रलंबित आहेत, पैसे वाल्यांचे काम लवकर होतात पण सामान्य नागरिकांचे काम धूळखात जाणूनबुजून ठेवल्या जाते. हा नागरिकांचा रोष आम आदमी पार्टी नागपूर यांच्या वतीने शेकडो नागरिक व पदाधिकारी यांनी नगर भूमापन कार्यालय येथे हल्लाबोल मोर्चा काढला.
“सरकार आपल्या दारी कार्यक्रमावर करोडो रुपये खर्च करून सुद्धा सामान्य नागरिकांना याचा फायदा झाला नाही. अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही, सामान्य नागरिक आपली रोज ची मजुरी सोडून कार्यालयाची चक्कर मारत असतात. भूमापन अधिकारी नागरिकांना सुनावणी साठी बोलावतात आणि स्वतः मात्र हजर राहत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे, आणि त्यांचा महत्त्वाचा वेळ वाया जात आहे.” असे सोनू फटिंग राज्य सचिव आम आदमी पार्टी यांनी निदर्शनात आणून दिले.
“सेवा हमी कायद्यानुसार २५ दिवसात कुठलाही फेरफार नोंद घेणे अनिवार्य असताना नगर भुमापन कार्यालयात किती नोंदी २५ दिवसात घेतल्या जातात हे नगर भूमापन अधिकारी यांनी सांगावे? नगर भूमापन कार्यालयात सर्व नियम धाब्यावर बसवून भोंगळ कारभार चालू आहे. दोन हजार केस प्रलंबित आहेत.
दोन प्लॉटचे एकत्रीकरण न केल्यामूळे असंख्य गाळाधारकांचे फेरफार नग़र भुमापन अधिकारींनी प्रलंबित ठेवलेले आहे,परंतु ले आउट प्रकरणांमध्ये सिटी सर्वे नंबर एकत्रीकरण केलेले नस्ताना सूध्दा बिल्डर लोकांकडून पैसे घेवूण प्रकरण स्वीकारले जात आहे असे होत आहे.
मौजा बिनाकी येथील फेरफार क्र 20146 न भु.क्र 2517 स्मशानभूमी व खेळाचे मैदाना साठी आरक्षित असलेला फेरफार दोन वर्षांपासून प्रलंबित असतांना नलवाडे यांनी हा फेरफार पैसे घेऊन केल्याची चर्चा सुरु आहे. या बाबत विभागीय आयुक्त यांनी चौकशी करावी ही जनतेची मागणी आहे.
आपण जर कामात सुधारणा केली नाही तर डेप्युटी डायरेक्टर यांच्या कडे आपली तक्रार केली जाईल. आणि त्यांच्या कडून पण 20 दिवसात न्याय नाही मिळाला तर आम आदमी पार्टी नागपुर तर्फे नगर भूमापन कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा अजिंक्य कळंबे शहराध्यक्ष आम आदमी पार्टी यांनी दिला.
“आम आदमी पार्टी जनतेच्या समस्यां सोडवण्यासाठी जनतेप्रति कटिबद्ध आहे. लोकांना आवाहन करण्यात आलं आहे जर प्रशासन आपल्याला वर अन्याय करत असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी आम आदमी पार्टी सदैव तत्पर असेल लोकांना न्याय मिळेल पर्यंत आम आदमी पार्टी संघर्ष करत राहील.”
मोर्चाला आम आदमी पार्टी नागपूर शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे, शहर महासचिव अरुणज्योती कन्हेरे, संघटनमंत्री रोशन डोंगरे, सचिन लोणकर शैलेश गजभिये संजय बोरकर गिरीश तीतरमारे अहिरराव जी संगीता बातो अलका पोपटकर पुष्पा डाबरे शुभम मोरे तेजराम शाहू हरीश वेलेकर,भरत जवादे, मनोज डोंगरे, नरेश महाजन प्रियंका तांबे विशाल पटले पिंकी बारापात्रे, रोहन वासनिक, रवींद्र कुथे, प्रतीक चोंडकाळे, मीना कुमरे, अंकीत ठाकरे, शुभम माकडे, रोशन कातोरे, अशोक सेलोटे व शेकडो नागरिक सामील झाले.














