बाबापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेची स्थापना

0
61

जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या हस्ते रिबीन कापून फलकाचे अनावरण

श्री. कोंडाय्या महाराज क्रीडा मंडळ आणि शिवसेना शाखेतर्फे भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन

सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज

श्री. कोंडाय्या महाराज क्रीडा मंडळ बाबापूर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने दि 26,27 फेब्रुवारीला भव्य पुरुषयांचे कबड्डी सामने आयोजित करण्यात आले. तसेच गावातील शाखेचे पुनरगठन करून शाखा फलकाचे अनावरण जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्याला उदघाटक म्हणून संदीप गिऱ्हे यांनी रिबीन कापून उदघाटन केले. तर अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांनी उपस्थिती दर्शवली.
क्षेत्रातील मायबाप शेतकरी बेरोजगार युवक कामगारांना न्याय देण्यासाठी शिवसेना उ.बा.ठा सैदव्य तुमच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन यावेळेस बोलताना शिवसेना आणि कामगार नेते बबन उरकुडे यांनी केले. याप्रसंगी तालुकाप्रमुख संदीप वेंरागडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, सुभाष आत्राम, वीर पुणेकर, किशोर बोडे, इंद्रजित वनकर, राजेंद्र गौऊकार, सुधाकर पडवेकर, सरपंच गोवरी आशा बबन उरकुडे, मंगला सुभाष आत्रम, गुड्डी राजू पाल आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here