राशन मध्ये दरमहा मिळणारे गव्हाचे प्रमाण वाढून द्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ला मागणी

0
48

अमरावती प्रतिनिधी

अमरावती – आजच्या महागाईच्या काळात राशन दुकानामधून होणारा धान्य पुरवठा सामान्य वर्गासाठी जिवन जगण्यासाठी मोठा आधार आहे शासनाकडून होणारा अन्न पुरवठा गोर गरीबांचा आहार असुन आजच्या धकधगीच्या जिवनात जगण्यासाठी मोठा आधार आहे परंतु अंदाजे दिड वर्षापासुन शासनाने राशन दुकानामधून गव्हाचे प्रमाण कमी केल्यामुळे गोर गरीब लाभार्थ्याला महागडे धान्य खरेदी करण्यास परवडत नाही. राशन दुकानामधून प्रती मानसी 5 किलो धान्याचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात येत आहे. पुर्वी 3 किलो गहू व 2 किलो तांदुळाचे वाटप करण्यात येत होते, गहू तांदूळ मिळून लाभार्थ्याला महिनाभर धान्य पुरत असे परंतु जवळपास दिड वर्षापासुन गव्हाचे प्रमाण कमी करून गहू 2 किलो व तांदूळ तीन किलो अशा प्रकारे पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे गोर गरीब लाभार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. गहू जास्त प्रमाणात मिळत नसत्यामुळे काही लाभार्थी तांदूळाची विक्री करुन त्यात स्वतःचे पैसे टाकून नालाईजास्तव बाजारातील महागडे गहू खरेदी करीत आहे. शासनाने धान्य पुरवठा वाढविला नाही परंतु मिळणा-या प्रती मानसी 5 किलो पुरवठयामध्ये फेरबदल करून एक किलो गहू व चार किलो तांदूळ असा फेर बदल केला आहे. असा फेरबदल न करता पूर्वी प्रमाणे 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ असा बदल करण्यात यावा, जेणे करुन ग्राहकांडून होणारी बाजारातील तांदुळाची विक्री थांबेल. गोर गरीब लाभार्थ्याला बाजारातील महागडे गहू खरेदी करावे लागणार नाही याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष अनिल शामलाल गौर, व सदस्य मंगेश भाऊ चिलात्रे, सुफियान कुरेशी, सागर गौर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री व, अन पुरवठा मंत्री, अमरावती पालकमंत्री,जिल्हाधिकारी अमरावती , अमरावती जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कडे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे व ईमेल पाठवून मांगणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here