चामोर्शी प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
चामोर्शी – शासनाच्या योजनेपासून वंचित असलेला गडचिरोली जिल्हा. येथील कलावंतांसाठी सतत काम करणाऱ्या समाजसेविका सारिका ताई उराडे आणि त्यांची टीम वृद्ध मानधन योजनेची फाईल तयार करण्यास सुरुवात केली आहे. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारे मार्कंडा देवस्थान येथे संत महात्म्यांची प्रेरणा घेऊन रात्रंदिवस भजन किर्तन ,प्रबोधन विनामूल्य करणारे अजूनही तुकडोजी महाराजांची प्रेरणा देत आहेत. त्यांना शासनाची मानधन योजना लागू होण्यासाठी अखिल भारतीय कलावंत न्याय समितीचे सर्व पदाधिकारी कसोटीने कामाला लागलेले आहेत. त्यामध्ये वरील मंडळी, सारिका उराडे, तुकाराम कोंडेकर महाराज, खांडेकर महाराज, जीवनदास महाराज, धनद्रे, मंगला, सुनील गडगिलवार, यशवंत उराडे, सर्वांनी फाईल व्हेरिफायसाठी अतूट परिश्रम घेतले. आणि 50 फाईल दाखल करण्यात आल्या.भजन गायिका नलिनी चलकलवार काकु व काकाजीने मोलाचे सहकार्य केले.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा 8888624167,9511876984

