बळीराम लांडगे
तालुका प्रतिनिधी,उदगीर
उदगीर (दि-११) राज्य शासनाच्या वतीने नुकताच २०२१ चा राज्यस्तरीय कृषीभूषण सेंद्रिय शेती वसंतराव नाईक पुरस्कार लोहारा येथील नैसर्गिक शेतकरी शाम सोनटक्के यांना मिळाल्याबद्दल लातूर येथील साई जिवलग मॉर्निंग वॉकिंग ग्रुप च्या वतीने लोहारा येथे त्यांचा सत्कार डॉ.सोमनाथ रोडे व डॉ.ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी डॉ.सोमनाथ रोडे (मा.प्राचार्य महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर व ज्येष्ठ विचारवंत)डॉ.बाबासाहेब ठोंबरे(प्राचार्य कृषी महाविद्यालय लातूर) प्रा.डॉ.शिंदे डॉ.दैवज्ञ चंद्रशेखर सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,गुंडेराव सावळे सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी पुणे, शिवाजीराव गिरी सेवानिवृत्त वनसंरक्षण विभाग चिखलदरा, गोकुळ पाटील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक लातूर, नवगिरे सेवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी भारतीय जीवन बीमा लातूर,गोरख गालफडे उद्योजक लातूर, कालिदास लांडगे अध्यक्ष रोटरी क्लब लातूर(सेवानिवृत्त विभागीय वाहतूक नियंत्रण एस.टी महामंडळ) लालासाहेब चव्हाण माजी सभापती पंचायत समिती रेणापुर,धनराज बिरादार सेवानिवृत्त अभियंता बांधकाम विभाग लातूर,दिलीप हैबतपुरे विस्तार अधिकारी शिक्षण विभाग जि.प्र.लातूर, सोमेश्वर वाघमारे सेवानिवृत्त जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी लातूर,साई ग्रुप सदस्य तसेच यावेळी लोहारा येथील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम धनराज बिराजदार यांनी आयोजित केला होता.

