प्रणित नामदेव तोडे
व्यवस्थापक संपादक
काल अहेरी येथे झालेल्या मुन्नूरु कापेवार ( धनोजे कुणबी ) समाज मेळाव्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते विठ्ठल मंदिर वार्ड येथील डाॅ.वेंकटेश कोलावार यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
डाॅ.वेंकटेश कोलावार हे नुकतेच क्रिग्रीस्तान देशातून एम.बी.बी.एस शिक्षणाची पदवी उत्तमरित्या पूर्ण करुन भारतात आलेले आहेत. वेंकटेश कोलावार हे त्यांचा मूळ गाव असलेल्या सिरोंचा शहरातील कापेवार समाजातील (कुणबी) पहिले एम.बी.बी.एस पदवीधारक आहेत.त्यांनी केलेल्या उत्तम यश संपादनबद्दल सदर सत्कार करण्यात आला आहे.त्यांनी या यशाचे श्रेय आई – वडील प्रमिला चंद्रय्या कोलावार,मोठे बंधू – वहिनी प्रियंका सतिश कोलावार,मजवे बंधू – वहिनी अरुणा तिरुपती कोलावार,तिसरे बंधू महेश कोलावार,पुतण्या गर्व कोलावार, पुतणी चकोर कोलावार व काका,काकू,चुलत बंधू व आपल्या गुरूजणांना दिले आहे.

