प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपुर – नई दिशा बहुउद्देशीय संस्थांच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिवस बापट नगर येथे संस्थेच्या अध्यक्षा पूजा शेरकी यांच्या पुढाकाराने कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात कोरोनाच्या काळात जीवाची परवा न करता परिवाराला बाजूला ठेवून जनतेची सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, शिक्षिका,आशा वर्कर,सफाई कामगार ,घंटागाडी कामगार, यांना सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके संध्या दानव, सरिता मालू, रेखा जाधव, वनश्री मेश्राम, सपना नामपल्लीवार, सरोज चांदेकर, सीमा चावडा, डॉक्टर जयश्री बुटे, पोर्णिमा मेरकुरे, रिता पाठक, पुनम झा, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. व उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नई दिशा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा पूजाताई शेरकी यांनी केले. तर आभार प्रदर्शन संस्थेच्या उपाध्यक्ष रेखा जाधव यांनी केले. यावेळी संस्थेच्या संपूर्ण पदाधिकारी व महिला तसेच भुवनेश्वरी धर्मपुरीवार गोपमवार शिक्षीका यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

