मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विजय संकल्पासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार
जस्मिन शेख
महिला विशेष जिल्हा प्रतिंनिधी
चंद्रपुर
चंद्रपूर, दि. १८ : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विजय संकल्पासाठी संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये दि. १९ मार्च २०२४ ला एकाचवेळी सायंकाळी ६ वाजता परमेश्वराची आराधना करण्यात येणार आहे. सामान्य कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी हे अनोखे आयोजन केले आहे.
मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाकरीता मतदारसंघामधील मंदिरांमध्ये विधिवत पूजा-अर्चना होणार आहे. याकरीता आमदार संजिव रेड्डी बोतकुलवार, आमदार डॉ. संदीप धुर्वे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे,लोकसभा प्रमुख प्रमोदभाऊ कडू, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, पुजनीय भागवताचार्य संत मनीष महाराज,रविंद्र बेल्लुरकर, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे, डॉ. मंगेश गुलवाडे, विवेक बोढे, प्रज्ज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, किरण बुटले, राजू गायकवाड, महेश देवकते, विशाल निंबाळकर, आशिष देवतळे, अनिल डोंगरे, श्रीनिवास जंगमवार, रितीक परचाके, रविंद्र पिंपळशेंडे पुजेचे व्यवस्थापन करतील, अशी माहिती आध्यात्मिक आघाडी लोकसभा सहसंयोजक मयूर चहारे यांनी दिली.

